shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंजवडी मध्ये घटना लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार 11 लाखांची फसवणूक..!!


पिंपरी चिंचवड:-लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाखांची फसवणूक केली. तसेच तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचारही केले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोनित डी. कपूर ऊर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय 34, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने रविवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वायभिसे याने फिर्यादी तरुणीला बीटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेतले. तसेच सिंगापूर येथे नोकरीकरिता, नर्सिंग कोर्सकरिता वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादी महिलेचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड वापरून अनेक गोष्टींची खरेदी करीत 11 लाखांची फसवणूक केली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
close