shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ॲड. केशव काळे यांना केज पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:
 केज येथिल जेष्ठ विधिज्ञ आणि समाजीक क्षेत्रातील ॲड. केशव काळे यांना केज पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त करण्यात आली.

या बाबतची माहिती अशी, केज येथीलजेष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील विधिज्ञ तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेले आणि पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड. केशव काळे यांचे कोरोनाच्या आजाराने उपचारा दरम्यान दि. १६ एप्रिल रोजी निधन झाले. 

त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी दि.१९ एप्रिल रोजी शासकीय विश्राम गृहावर आदर्श पत्रकार समिती, सक्रिय पत्रकार समिती आणि झुंजार पत्रकार संघ यांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यात प्रा. हनुमंत भोसले, डी. डी. बनसोडे, विजयराज आरकडे, ॲड. तपसे आणि गौतम बचुटे यांनी ॲड. केशव काळे यांचे सामाजिक कार्य व आठवणींना उजाळा दिला.

या शोक सभेला आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष अशोक सोनवणे, सक्रिय पत्रकार समितीचे डी. डी. बनसोडे, प्रा. हनुमंत भोसले, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे, विनोद शिंदे, शेख मजहर, प्रकाश मुंडे, ॲड. तपसे, बळीराम तांदळे, बळीराम भोसले, गौतम बचुटे हे उपस्थित होते.
close