नारायणडोहो गाव आठ दिवस बंद
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे कोरोना बाधीताचा आकडा वाढतच चालला असुन सोमवार (दि.१२) झालेल्या रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 154 लोकांची तपासणी केली आहे. या मध्ये एकुण 154 लोकांची तपासणी करण्यात आली.या मध्ये 39 पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले.कुटुंबातील अनेक सदस्य मित्र यांना याचा प्रसाद मिळाल्याने बांधीत रुग्ण ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाऱ्यासारखी वाढतच चालली आहे.
यातील काही बांधीत रुग्णांना त्रास जाणवत नसल्याचे रुग्ण स्पष्ट सांगत आहे.रॅपिड ॲन्टिजेन शिबीर यशस्वीतेसाठी नारायण डोह गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,व आशासेविका,मदतनीस,डॉ.दातिर मॅडम,डॉ.रायपिल्ले व त्यांचे सहकारी बांधव भगिनी सिस्टर, कार्यकर्ते व ज्यांनी मनाचा मोठपणा दाखवून स्वतः हा येऊन कोराना चाचणी केली व सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

