नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-अहमदनगर जिल्हा हद्दी जवळील साकत बुद्रुक ता.आष्टी जिल्हा बीड येथे आज प्रा.आरोग्य केंद्र खुंटेफळ यांच्य वतीने साकत येथील जिल्हा परिषद शाळा आवारात रॅपिड ॲटीजेन टेस्ट कँप आयोजित करण्यात आला होता.गावाकडे वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील साकत खुर्द आणि बीड हद्दीतील साकत बुद्रुक अशी दोन नावाची गावं जवळ जवळ आहेत.या दोन्ही गावांच्या मध्ये फक्त सिना नदी आहे.
महसुली हद्दी जरी वेगवेगळ्या असल्यातरी व्यवहारची सर्व देवाण- घेवाण करण्यासाठी या गावातील नागरिक त्या गावात ये जा करत असतात. त्यामुळे एकमेकांचा संपर्क येत असल्याने कोरोना बांधीताचा आकडा वाढतच चाललेला आहे.आज रॅपिड टेस्टचा अहवाल
साकत बुद्रुक 3, लोणी 1, कोयाळ 1, दहिगाव 1, अशा जवळपासच्या गावाची आकडेवारी आली आहे.तरी नागरिकांनी शासनाने कोरोना नियम निर्धारित ब्रेक चेन आदेश करण्यात आले व कलम १४४ पालन करावे.
कोरोना फैलाव पसरण्या पासून थांबवा जेणेकरून आपल्या पासून इतरांना व गावातील नागरिकांना धोका पोहचणार नाही. यांची दक्षता घेण्याचे आव्हान संरपच ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना केले.

