shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज सोनईत ॲन्टीजेन रॅपिड टेस्ट मध्ये 20 जण पाॅझिटिव...!


 प्रतिनिधी ।  मोहन शेगर:
सोनई : आज सोनई महादेव मंदिर जि.प शाळेत आज घेण्यात आलेल्या कोरोना ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट मध्ये 20 जण पाॅझिटिव आले.

आज दुपारी 12 ते 2 यावेळेत सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोनईतील जवळपास  50 जणांची ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आली, यात 20 जणांचा अहवाल पाॅझिटिव आला.यावेळी मेडिकल ऑफिसर डाॅ.पुनम भुसारी,डाॅ.स्मिता चेके,डाॅ.गागरे मॅडम,आरोग्य समन्वयक रमेश जावळे,एन.व्ही विरकर,सचिन चव्हाण,सरवणकर यांची टिमने सोनई परिसरातील कोरोना रूग्णांची तपासणी केली.यावेळी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाची पण कोरोना  तपासणी करण्यात आली.सोनई गावात ॲन्टिजेन रॅपिड टेस्टची सोय करण्यात आल्या बद्दल सोनई गावच्या नागरिकांनी वैघकिय पथकाचे अभिनंदन केले.

यावेळी सोनई गावचे सरपंच धनजंय वाघ व सामाजिक कार्यकर्ते नितिन दरंदले व युवानेते  उदयन गडाख यांचे स्विय सहायक रमेश देशमुख सर यांनी रॅपिड टेस्ट सेंटरला भेट देत पाहणी करून सुविधा उपलब्ध करून दिल्या.
close