केळीचे पवित्र आरोग्यदायी पान
केळीचे झाड पवित्र, औषधी गुणांनीयुक्त असल्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. विशेष पूजाकर्मात केळीच्या पानांचा मंडप करतात. हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. केळीचे झाड घराच्यासमोर किंवा बागेमध्ये लावणे शुभ मानले जाते.
केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
केळीच्या पानात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स ऍंटीऑक्सीडंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे ऍंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे ऍंटीऑक्सीडंट त्वचा दीर्घकाल सतेज ठेवतात.
त्वचेवरील पुरळ, डाग, मुरूमांवर खोबरेल तेल लावलेले केळीचे पान गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर बरे होतात.
सुकलेल्या केळीच्या पानांचा चुरा गवतीचहा, तुळस, सुंठीसह उकळवून प्यावा. फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.
सुलभ प्रसूतीसाठी दररोज केळीच्या पानावर भोजन करावे.अन्नपदार्थ केळीच्या पानात गुंडाळून ठेवल्यास खराब होत नाहीत.
चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक.
मोबाईल : ९८८१३७३५८५

