नवी दिल्ली :- देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.
देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. 24 तासात तब्बल 3 लाख 86 हजार 888 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 501 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

