एक लक्षात घ्या की प्रारब्ध कर्म असल्याशिवाय कोणी कोणी कोणाला मदत करत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर उपकार करते तेव्हा ते उपकार घेणार्याचे प्रारब्ध कर्म असते आणि उपकार करणारा देखील त्याचे गेल्या जन्माचे कर्ज फेडत असतो. आता मदत करताना, मदत करणारा आणि देणारा हे मूळ घटक आहेत.
मात्र मध्येच कोणीतरी तो मदतीचा घास आमक्याच्या तोंडात घालू नका म्हणून बोलतो याचा अर्थ ती व्यक्ती गरजवंताच्या तोंडाचा घास काढते. हे देखील संबंधितांच्या प्रारब्ध कर्मामुळे घडत असते. आता हातातोंडाशी आलेला घास जेव्हा गरजवंताच्या /लाभार्थीच्या तोंडात जात नाही तेव्हा ती व्यक्ती तळतळाट करते आणि तोंडातला घास हिसकावून घेणाऱ्याला ते तळतळाट लागतात. त्यामुळे कधीही दान करणारे असतात ते दान करून मोकळे होतात. दुसऱ्याला मदत करणे ही आंतून आलेली उर्मी असते, नैसर्गिक असते. यामागे स्वार्थ नसतो. देणारा देतो घेणारा घेतो. अनेकदा ते एकमेकांना ओळखतही नाहीत आणि अनेकदा समोरासमोर अनेक वर्षे उपकाराचे ओझे घेणारे भविष्यात उपकारकर्त्याला विचारतही नाहीत. हा सगळा नियतीचा खेळ आहे. उपकार घेणारा तुमचा घेणेकरी असतो आणि तुम्ही देणेकरी असता. या जन्मात ती देणे तुम्ही फेडायला हवीत. नाही फेडली तर हे प्रारब्ध कर्म पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. मात्र नियती तुम्हाला अशी गतजन्मातील देणी फेडण्याची संधी देते. नियती प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार ऐश्वर्य,धनसंपत्ती, दुःख, वेदना देत असते. आपला देह हा हे भोग भोगत असतो. अशावेळी मनाला जे योग्य वाटेल ते करावे आणि आपल्या गतजन्मीच्या प्रारब्ध कर्मानुसार ऋणमुक्त व्हावे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
हे कर्म करणाऱ्यांना कुणीही अडवू नये, कारण नैसर्गिक न्यायाच्या विरोधात वागले की त्याचा त्रास हा होत असतो. आपल्या स्वतःच्या हेकेखोर वृत्तीचा आपल्याला त्रास होत नाही का?. तेव्हा नीतिशास्त्रात असे म्हटले आहे की मौनम् सर्वार्थ साधनम् , जसे कर्तृत्वाने पुरुषार्थ सिद्ध होतो तसाच दान केल्याने हाताला शोभा येते.
समय से पहले और भाग्यसे अधिक किसी को कुछ मिलने वाला नही और जो कुछ मिला है वो साथ लेके कोई भी जाने वाला नही! कर्तृत्ववान संताने कभी बाप कमाईपर गुजारा नही करते, अपना रास्ता खुद चुनती है!
तेव्हा प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त ऐश्वर्य स्वतः उपभोगा आणि आपल्या परिचितांना गरजवंतांना गरजेच्या वेळी आपल्या ऐश्वर्यातील काही भाग/ मदतीचा हात पुढे करा. राष्ट्रासाठी / समाजासाठी स्वतःचं प्राणार्पणही करणे हा आपला त्यागाचा इतिहास आहे. पैसा हा गौण विषय आहे पण ती जगण्याची गरज आहे. म्हणून हे विस्ताराने लिहिले आहे आहे की आपल्याच भाऊबंदांना मदत करताना विचार करू नका. त्यांना प्राप्त संकटातून बाहेर काढून समाजाच्या चाकोरीत आणण्याचा प्रयत्न करा.
चंद्रकांत शहासने पुणे
९८८१३७३५८५

