यावरी उपाय, साधा सोपा जाणा!आहार नियमित, करतच जावा. !! १ !!
लवकर उठा, लवकर झोपा! हाच मंत्र जपा, आरोग्यदायी !! २ !!
साधे साधे रहा, नको स्वैराचार! नको भपकेबाज, दारू पाणी !! ३ !!
सात्विक आहार, वेळेवर घ्यावा! पळवावा रोग, शरीरांतून !! ४ !!
योग ध्यान ऐसे, करा आचरण ! लोकजागरण, करा ऐसे !! ५ !!
व्यायाम करावा, रोज पहाटेस! स्नानादीक कर्म, साधना जप !! ६ !!
सात्विक विचार, करा जपणूक! उगाचच त्रागा, द्वेष नको !! ७ !!
सर्वांशी भेटून,आदराने बोला!
जयामुळे लाभते, समाधान !! ८ !!
चित्त स्थिर होता, काळजा आराम !
ना जळते काळीज, ऐसे करता !!९!!
काळीज चांगले, सर्वची चांगले! कधी मधुमेह, होणार नाही !! १० !!
नको क्रोध चिंता, कोणत्या गोष्टींची! याने कधी बी.पी, होणार नाही !!११ !!
नको मोहमाया, नको तिरस्कार! जीवन आनंदी करण्यासाठी !! १२ !!
वाताचे दुखणे, न होते सांध्यात! आसने दररोज, केल्यामुळे !! १३ !!
वेळेवरी स्नान, वेळीच भोजन! नको धावपळ, नको गडबड !! १४ !!
यासाठी केवळ, राहावे साधेच! विचार असावे, संतांसम !!१५ !!
सात्विक कर्माचे, फळही सात्विक!!साराच समाज, सुदृढ होतो !! १६ !!
सुदृढ समाज, सुदृढ हो गाव! सुदृढ गाव, देशही सुदृढ !! १७ !!
ऐसे होता जगी, पसरेल कीर्ती! होईल महासत्ता, भारत माता !! १८ !!
रचनाकार : चंद्रकांत शहासने .
देशभक्तकोशकार, पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५

