मोर्शी - मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 45 वर्षांवरील सर्वांसाठी कोविड लसीकरणास सुरुवात मोर्शी शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मेघनाताई मोहन मडघे यांच्यापासून सुरुवात करून शुभारंभ करण्यात आला.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यावरील लसीकरण त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन कर्मचारी त्यानंतर 60 वर्षांवरील कोविडचे लसीकरण यशस्वी पार पडत आहे.
यावेळी मोहन भाऊ मडघे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप टिंगणे,आरोग्य सहायक विनायक नेवारे,विनय शेलुरे औषध निर्माण अधिकारी सुनील तांबडे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आशिष पाटील,आरोग्यसेविका पुष्पा पंधरे, प्रिती ठाकरे,भारती राऊत,कल्पना पंधरे,आरोग्य कर्मचारी विजय गाढवे,राजेंद्र सावळकर,प्रशांत बेहरे,सुधाकर कडू,प्रकाश मंगळे,चंद्रसेन जाधव,राहुल भोसले उपस्थित होते.......

