जन आधार महिला परिचर महासंघ अहमदनगर या नावाने जन आधार विभाग कार्यान्वित करण्यात आला..!
नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
कोरोना महामरी रोगाचे संपुर्ण एक वर्ष लोटले आहे.तरी पण कोरोना संपण्याच्या मार्गावर दिसत नाही. याच अडचणी च्या काळात महत्वाची कामगिरी पार पाडत असलेला एक गट अनेक दिवसांपासून वंचित राहिलेला आहे. त्यांमुळे जिल्हा परिषद अहमदनगर मधील आरोग्य विभागातील महिला परिचराना जन आधार संघटनेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील महिला परिचर महासंघ अहमदनगर या नावाने विभाग तयार करण्यात आला आहे.
महिला परिचर यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दि.१/४/२०२१ पासून सुरवातीला केली यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जन आधार संघटना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन मार्फत सर्व अडचणी कळवणार आहे जर येत्या काही दिवसांत या आरोग्य विभागातील महिला परिचर यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीतर जिल्हा परिषद समोर पहिला परिचय यांना सोबत घेऊन आंदोलन छेडु असा हा ईशार जन आधार संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असे जन आधार संघटनेच्या अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सांगितले आहे.
या वेळी संघटनेचे दिपक गुगळे, अमित गांधी, काळे साहेब, महिला परिचर संगीता महाडिक, प्रतिभा सोनवणे,सुरेखा जाधव,उषा केदार, आदी मान्यवर उपस्थित होते.

