shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्यदायी पळसाचे पान....!


मित्रांनो पळसाला पाने तीन अशी म्हण आहे. या म्हणीत ध्वनित केलेलं आहे ते आहे वैश्विक सत्य. जसे ओमकारात अकार, उकार, मकार. शरीर शास्त्रांमध्ये कफ, पित्त, वात. स्वभाव गुणांमध्ये सत्त्व, रज, तम. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात अणू, रेणू, परमाणु .विश्वाचा खेळ उत्पत्ती, स्थिती,लय.असा हा त्रिगुणाचा खेळ म्हणजे पळसाचे पान. 

पळस नावाची एक वनस्पती आहे म्हणजे औषधी झाड आहे. याच्या प्रत्येक फांदीला तीन पाने असतात. अलीकडे आपण जेवणासाठी जशा कागदी अथवा थर्माकोलच्या डीश वापरतो तशाच प्रकारच्या पळसाच्या पानापासून बनवलेल्या डिशेस अर्थात पत्रावळी,द्रोण हे फार पूर्वीपासून आपल्या पंक्तीत म्हणजे जेवणासाठी वापरले जात असत. यातून फार मोठे पर्यावरणीय तत्व तसेच आरोग्य शरीर विज्ञान साधले जात असे.

लग्नामध्ये/गावभोजनामध्ये शेणाने सारवलेल्या अंगणात पळसाच्या पानाच्या पत्रावळी मांडल्या जायच्या आणि त्यावर जेवण म्हणजे गरमागरम भात, भाजी असं सर्व वाढलं जायचं. जेव्हा अन्न पत्रावळीत वाढले जायचे तेव्हा त्या पळसाच्या पानातील औषधी अन्नात मिसळली जायची आणि पचनक्रिया उत्तम व्हायची.
पळसाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आजही आपणास पळसाची पाने सहजगत्या उपलब्ध होतात दररोजच्या जेवणात आपल्या ताटात पळसाची पाने ठेवून त्यावर अन्न घेऊन ते खाल्ले तर निश्चितच ते आरोग्यदायी ठरते.

पळस आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे याबाबत आपण गुगल सर्च द्वारे सहजगत्या माहिती घेऊ शकता. पळसाच्या पानावर जेवण हे निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी फारच लाभदायी आहे.
पूर्वी गावोगावी सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद हा पळस, वड अशा झाडाच्या पानात देण्याची प्रथा होती. कागदी द्रोण वापरले जात नसत यामध्ये हेच आरोग्याचे तत्त्व होते. पहा आपल्याला जमलं तर करा. 

चंद्रकांत शहासने, 
निसर्गोपचारक. 
पुणे ९८८१३७३५८५
close