shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा नेते भानुदास कुसमुडे अनंतात विलीन...

युवा नेते भानुदास कुसमुडे अनंतात विलीन..

वांबोरी : भानुदास कुसमुडे यांचे  निधन झाले आहे. पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, ते ५० वर्षांचे होते. 


त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, वहिणी, पुतणे असा परिवार आहे. भानुदास कुसमुडे यांच्या पार्थिवावर आज मंगळवार रोजी  सकाळी ८ वाजता वांबोरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. 

मुळा प्रवारा वीज को.आँ. सोसायटीचे माजी चेअरमन सुखदेव कुसमुडे यांचे धाकटा मुलगा होत, तसेच राहुरी पं.स. माजी सदस्या रोहिणी कुसमुडे यांचे ते पति होत. त्यांच्या धर्मपत्नी अखेरच्या श्वासापर्यंत पुणे येथील रूग्णालयात सोबत होते. राहुरी तालुक्यात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देत हळहळ व्यक्त केले जात आहे.
close