shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची बाधा..! जेष्ठ नेते यशवंतराव गडाख ही बाधीत..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई: जलसंधारण मन्त्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोबत त्यांच्या घरातील चार सदस्याही बाधित  झाले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हेही बाधित झाले आहेत.
 
११ मार्च रोजी यशवंतराव गडाख यानी कोरोनाची लस घेतली होती. गडाख कुटुंब बाधित झाल्याची माहिती त्याच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मी गृह विलगिकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घेवून तातडीने तपासणी करुन घ्यावी.

शासनाच्या सूचनाचे पालन करावे तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी करावी. मास्क वापरा, नियमित हात धुवा, विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मंत्री शंकरराव गडाख यांनी सोशलमिडीयाद्वारे केले आहे.
close