shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट,या पार्श्वभूमीवर शनिदर्शन बंद..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर : 
सोनई--महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथील शनिदर्शन भाविकांसाठी सोमवार ( काल दि.५ पासून) बंद करण्याचा निर्णय देवस्थानच्या प्रशासनाने नुकताच घेतला आहे.


दरोरोज शनिशिंगणापूर येथे हजारो भाविक देशाच्या कानोकोपऱ्यातून  शनिदर्शनसाठी येत असतात,आता कोरोना विषाणूच्या संसर्ग वाढू नये म्हणून "ब्रेक दी चैन"या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळणे हाच उद्देश असल्याने शासनाच्या आदेशाचे आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढील शासन आदेश येईपर्यंत शनिदर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. 

तसे सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त,पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

सालाबादप्रमाणे शनिमंदिर परिसरात  गुढीपाडवा व महंत उदासी महाराज यांचा सप्ताह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.-- तांत्रिक अधिकारी नितीन शेटे,शनिशिंगणापूर
close