shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खर्डा पत्रकारांच्या माध्यमातून आरोळे कोवीड सेंटरला मदत.


रोख रक्कम आणि धान्य ,किराणा  भाजी माध्यमातून पंच्याहत्तर रुपये मदत आरोळे  कोविड सेंटर कडे सुपूर्द 

खर्डा  I प्रतिनिधी :-
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा पत्रकार संघाच्या माध्यमातून गावात आरोळे कोविड सेंटर ला मदत म्हणून गावात मदत फेरी काढून धान्य आणि रोख स्वरूपात रक्कम जमा करून जामखेड येथील आरोळे कोविड सेंटर ला सुपूर्द करण्यात आले.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्रात भयानक परिस्थिती निर्माण झाले असल्याने कोरोना बाधीताचे आलेख वाढत आहे त्यातच जामखेड तालुक्यातील जनतेसाठी   आरोळे कोविड सेंटर वरदान ठरत आहे .अनेक राजकिय ,सामाजिक संघटना पुढे येऊन मदत करण्यात येत आहे.

आपणही काही तरी समाजाचे देने लागतो या भावनेतून खर्डा पत्रकार संघाच्या वतीने जनतेला मदत करण्यासाठी आव्हान करण्यात आले होते ,यामध्ये गावात मदत  फेरी काढण्यात आले.गाव बंद असतानाही अनेक नागरिकांनी आपापल्या परीने स्ववीच्छेदन मदत करण्यात आले .यात रोख रक्कम आणि गहू,तांदूळ, ज्वारी, बाजरी ,विविध प्रकारचे डाळी, किराणा ,भाजी ,औषधे  इत्यादी स्वरूपात मदत जमा झाले .ती सर्व मदत ग्रामीणआरोग्य प्रकल्पच्या संचालिका डॉ शोभा आरोळे  कर्मचारी सुलताना शेख कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी याच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आले .

    
यावेळी शहरातील लहान मुले, नागरिकांनी जन्म दिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा न करता कोरोनाग्रत्ताना मदत देण्यात आले. त्याचप्रमाणे  खर्डा येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापारीने या मदत कार्यात मोठा प्रतिसाद दिले.

यावेळी खर्डा पत्रकार संघाच्या वतीने जनतेला मास्क वापरा ,सुरक्षित अंतर ,शासनाच्या घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान देखील  यावेळी करण्यात आले .यावेळी पत्रकार संतोष थोरात,किशोर दूशी, दत्तराज पवार ,अनिल धोत्रे,धनंजय जवळेकर,धनंजय जव्ह्येरी यांच्या उपस्थितीत मदत फेरी पार पडले .

खर्डा येथील पत्रकार यांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले मदत आरोळे कोविड सेंटरला सुपूर्द करताना.
close