सन २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून डेक्कन चार्जर्स हैद्राबाद हा संघ सामील झाला होता. डेक्कन चार्जर्सने सन २००९ मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्येये विजेतेपदही मिळविले होते. मात्र त्यानंतर काही तांत्रिक कारणांनी हा संघ सन २०१३ नंतर या स्पर्धेपासून दूर झाला आणि त्याची जागा सनरायझर्स हैद्राबाद या संघाने घेतली. मागील पाच वर्षापासून सन रायझर्सची आयपीएलमधील कामगिरी सातत्यपूर्ण चांगली होत आहे. सन २०१६ मध्ये त्यांनी मिळविले विजेतेपद आतापर्यंतच एकमेव विजेतेपद ठरले आहे. त्यानंतर हा संघ प्रत्येक सत्रात प्ले ऑफ मध्ये गेला. परंतु सन २०१६ ची कामगिरी पुन्हा करू शकला नाही. सन २०१७ ला एलिमिनेटरमध्ये केकेआर कडून पराभूत झाला. सन २०१८ मध्ये अंतिम सामन्यात चेन्नई कडून पराभूत झाला. सन २०१९मध्ये एलिमिनेटर तर सन २०२० मध्ये क्वॉलीफायर दोन मध्ये दिल्लीकडून पराभूत झाला.
सन २०२१ या सत्रासाठी त्यांनी संघात मोठे फेरबदल न करता छोटी मोठी डागडुजी करत संघाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. सनरायझर्सची फलंदाजीची फळी बघितली तर यंदा चांगलीच मजबूत दिसते. कर्णधार डेेव्हीड वॉर्नर व जॉनी बॅरिअस्टो ही सलामीची जोडी या स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीवीरांच्या जोडीपैकी एक आहेे. याशिवाय जेसन रॉय, केन विल्यमसन हे खतरनाक परदेशी फलंदाज तर मनिष पांडे व वृध्दीमान साहा हे आक्रमक खेळणारे भारतीय खेळाडू सन रायझर्सच्या फलंदाजीचा मुख्य आधार असतील.
मागच्या सत्रात दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनामुळे त्यांच्या वेगवान गोलंदाजीला धार आली आहे. त्याशिवाय, यॉर्कर किंग टि नटराजन यांचा समावेश असेल. तर राशिदखान व मुजीब उर रहमान हे दर्जेदार फिरकी गोलंदाजही सन रायझर्सची फिरकी गोलंदाजी भक्कम बनवते. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी व विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. परंतु त्यांना संधी किती मिळते व त्या संधीचा लाभ कसा उठवता हे बघणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
या संघाच्या काही कमकुवत बाबीही .
आहेत. केन विल्यमसन वगळता मधल्या फळीत अनुभवाची कमी जाणवते, आणि अंतिम अकरा जणांचा संघ खेळवताना प्रत्यक्षात विल्यमसनला डावललेही जाऊ शकते. मागच्या सत्रात सनरायझर्सची मधली फळी अननुभवी प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा व अब्दुल समद वर अवलंबून होती. त्याचा त्यांना तोटाही झाला होता. तेंव्हा ऐनवेळी संघात आलेल्या विंडीजच्या जेसन होल्डरमुळे थोडीफार बळकटी मिळाली होती. यावेळी केदार जाधव नव्याने संघात आला खरा पण तो त्याचा जुना खेळ करेल का ? हा सुध्दा मोठा प्रश्न असेल.
या संघाची खास कमजोरी म्हणजे ते सर्वात जास्त परदेशी खेळाडूंवर जास्त अवलंबून असतात. डेव्हीड वॉर्नर व राशीद खान तंदुरूस्त असले तर त्यांचे संघातील स्थान पक्के असते. मग परदेशी खेळाडूंच्या दोन जागांसाठी केन विल्यमसन, जेसन राय व अष्टपैलू जेसन होल्डर यांच्यात रस्सीखेच असते.
सन रायझर्सने या सत्रासाठी निवडलेला संघ असा असेल : - डेविड वार्नर (कप्तान), केन विलियम्सन, विराट सिंग, मनिष पांडे, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बेसिल थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.
Dr.Datta vighave,
Cricket critics,
International member of World Parliament,
Member of United nations Global Talent Pool,
Representative of India.
Email: -dattavighave@gmail.com
Twitter :-Dr.Datta vighave
@Drvighave
Instagram:-
dr.dattavighave

