shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाड पोलीसांनी पालकांचे समुपदेशनाने प्रेमी युगूलांची बांधली रेशीमगाठ..!


दि.07/03/21
करमाड । प्रतिनिधी:
करमाड येथील राहणारी राजश्री ( नाव बदलले आहे . ) आणि पळशी ता . औरंगाबाद येथील राहणारा रमेश ( नाव बदलले आहे ) दोघांचेही एकमेकावर जिवापाड प्रेम दोघेही सुशिक्षित व सज्ञान असल्याने लग्न करून सहजिवन एकत्र राहुन संसार करण्याची ईच्छा .. परंतु एकाच जातीचे ( समाजाचे ) असुनही दोघांचेही घरातुन लग्नाला विरोध होवु शकतो . या कल्पनेतुन दोघांनीही पळुन जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला .. यावरून काल दिनांक ६/४/२०२१ रोजी पोलीस ठाणे करमाड येथे मुलीची मिसींग दाखल करण्यात आली . करमाड ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस यांनी याबाबत तातडीने पावले उचलत मुलीचा कसोशिने शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांना समजले कि तिचे पळशी येथील रमेश ( नाव बदलले आहे ) याचेवर प्रेम असुन दोघेही लग्न करण्याचे उद्देशाने पळुन गेले आहे . याबाबत तात्काळ मुलाचे भावजी यांचेशी संपर्क करून त्यांना मुली बाबत सखोली चौकशी करता त्यांनी राजश्री ही रमेश सोबत असल्याचे मान्य केले. 

या मिसींगची तपास करणारे पोलीस अंमलदार श्री आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी तात्काळ मुलीचे वडिल व इतर नातेवाईक यांचेशी संपर्क करून त्यांना मुलगी सुखरूप असुन तिला रमेश याचेशी विवाह करणे आहे असे कळविले . परंतु मुलीचे आई – वडिल व इतर नातेवाईक यांनी सुरुवातीस या विवाहस विरोध दर्शविला . परंतु त्यांचे या विवाह बाबत असलेले गैरसमज तसेच मुलीच्या भविष्याबाबत कायदेशिर बाबीची त्यांना माहिती देण्यात आली . तसेच पोलीसांनी त्यांचे समुपदेशन केल्याने दोन्ही कडील कुटुंबीयांनी या विवाहाला मान्यता दिली . त्यानुसार आज दिनांक ७/४/२०११ रोजी संध्याकाळी ०७ वाजेच्या सुमारास पळशी येथील मुलांचे भावजीच्या घरी पोलीसांचे मध्यस्थीने अत्यंत साधेपणाने मुलीच्या आई- वडिल यांचे उपस्थितीत या दोघांचा विवाह समाजाचे रिती रिवाजा प्रमाणे लावुन दिला आहे . 

याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले असुन दोन्ही कुटूंबानी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे . मा . मोक्षदा पाटील , पोलीस अधीक्षक यांनी याबाबत पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांचे कौतुक करून अभिनंदनासह त्यांना बक्षीसही जाहिर केले आहे .
close