shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..!!

प्रकाश मुंडे  । केज जिल्हा प्रतिनिधी:-  
केज शहरामध्ये आज समर्थ नगर,वकिलवाडी व क्रांती नगर तसेच नागनाथ जावळे यांच्या घरी, फुलेनगर भागात कोरोनाचे सर्व नियम पाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली.                        

आज समर्थ नगर,वकिलवाडी येथे पंचायत समिती सदस्य सुग्रीव कराड,नगरसेवक शिवाजी अप्पा हजारे,आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे,विजय आरकडे,प्रकाश मुंडे तसेच शकिल सय्यद,लक्ष्मण भाऊ जाधव,बापु गायकवाड,पोपट बनसोडे, कवी गायकवाड व इतर भीम अनुयायांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.              

      
क्रांती नगर भागात पशुपतीनाथ दांगट पाटील,प्रवीण भाऊ शेप,भाई मोहन गुंड व वरील सर्व मान्यवर व क्रांती नगर भागातील असंख्य भीमसैनीक यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रसादाचे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले होते..                           
फुलेनगर येथील ध्वजारोहण हारूनभाई इनामदार, सुमेध शिंदे,अशोक गायकवाड,आजय भांगे,सुदेश सिरसट पत्रकार हंडीबाग सर व बाळासाहेब भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.                



यावेळी असंख्य भिम अनुयायींच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमी वर मिरवणूक न काढता अतिशय साध्या पणाने डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
close