shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांचेकडून पिडीत महिलेला हवाय न्याय..!



नगर शहर । प्रतिनिधी:

जमिनीच्या वादविवादात फसवणूक, मारहाण , कोर्ट कचेरी हे काही नवीन नाही .  अशीच एक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे गावात राहणारी पिडीत महिला  भिमाबाई महादू भोस ( वय - ८२ ) मागील ९ वर्षांपासून शिरूरमधील तिच्या कुटुंबाकडून तिच्यावर होत असलेला अन्याय दूर व्हावा आणि न्याय मिळावा म्हणून प्रतिक्षेत आहे .


भिमाबाई सध्या नगर येथे रहात असून  निमोणे गावात यांची शेतजमीन आहे . २०१७ साली भिमाबाई यांना त्यांच्या सुनेने मुलाला नोकरीसाठी शेत जमिनीच्या कागदपत्रांची मागणी करून फसवुन सदर शेतजमीन नावे करून घेतली .

 काही दिवसा नंतर जेव्हा भिमाबाई या त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता त्यांची सुन सुशिला कैलास भोस , नातु प्रशांत आणि सनी यांनी भिमाबाई यांना शेतातून ओढून फरफटत आणत मारहाण केली . तसेच रहात्या घरातून हाकलून दिले . नातु सनी कैलास भोस हा शासकीय कर्मचारी आहे.

परिणामी भिमाबाई यांनी या विरोधात शिरूर पो. स्टेशन ला तक्रार दिली . परंतु  फक्त तक्रारअर्ज घेण्यात आला. आजता गायत त्यांना कोणताही न्याय मिळाला नाही. भिमाबाई यांना व त्यांच्या नगर येथील कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे ते सांगतात.

भिमाबाई यांनी न्याय मिळावा व त्यांच्यावरील अन्याय दुर व्हावा म्हणून मा . मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री , तसेच महसुल मंत्री , पो. उपायुक्त पूणे तसेच संबंधीत विभागातील इतर ठिकाणी वेळोवेळी पत्रव्यवहार ही केलेला आहे. पण त्यांच्या कोणत्याही पत्राला अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही आणि त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

भिमाबाई यांनी शिरूर पो.स्टे.मध्ये कित्येक वेळेस शिरूर येथील नातू आणि सुने विरोधात तक्रारी दिल्या आहेत. परंतु सदर पो.स्टे कडून कोणतीही कार्यवाही वा सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भिमाबाई यांनी केला आहे .

सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ जरी असले तरी पिडीत भिमाबाई यांच्यावरील अन्याय दूर व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा आहे.

मा . मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि संबंधीत विभागाने  त्यांच्या पत्राची दखल घ्यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली .
close