प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई :- जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले (वय-७०)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.चाळीस वर्षाच्या पत्रकारीतेत त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक व राजकीय विषयावर सडेतोड लिखान केले. स्व.वसंतराव देशमुख पुरस्कारासह दहाहून अधिक पुरस्कार मिळाले होते.त्यांच्या मागे दोन भाऊ,एक बहीण, पत्नी, तीन मुले,स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
ते एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, विनायक दरंदले व राजेंद्र दरंदले यांचे बन्धू, शनैश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांचे वडील तर अमोल, अरुण दरंदले यांचे चुलते होत.एकता पत्रकार संघ,सोनई प्रेस क्लब, यश ग्रुप, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

