shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची चिंचोडी पाटिल येथील कोवीड सेंटरला भेट व पाहणी..!

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.ईजेंक्शन,ऑक्सिजन, बेड यांची कमतरता भासत आहे. या गोष्टीचा आढावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून अडचणी जाणुन घेतल्या.

यावेळी मा सभापती  प्रविणदादा कोकाटे यांनी रूग्णालयास आवश्यक असणारे वाढीव ऑक्सिजन बेड, औषधे , तसेच डॉक्टर्स व स्टाफ यांची मागणी केली. यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना याठिकाणी सेवा मिळू शकेल. या मागणीस  नामदार तनपुरे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच सर्वच बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे,वैद्यकीय अधीक्षक डॉ नेवसे,मा सरपंच दिपक चौधरी,ग्रा प सदस्य अशोक कोकाटे,प्रशांत कांबळे,सचिन ठोंबरे ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे आदिं ग्रामस्थ उपस्थित होते.
close