shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नारायणडोहो येथे तिसरा कॅम्प, एकूण ५० तपासणी ५ बाधीत..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-

कोरोना थैमान जगभर चालु असताना यातुन खेडेगाव सुध्दा सुटले नाही.नगर तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी काही दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून  आले होते. मंगळवार (दि.२३) रोजी या ठिकाणी नारायणडोहो येथे माजी सभापती  प्रविण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड ची रॅपिड ॲटीजेन टेस्ट तिसरा कॅम्प घेण्यात आला.

या ठिकाणी ऐकूण ५० तपासणी साठी रुगणांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये बाधीत रुग्ण संख्या ०५ आढळून आली व  ४५ निगेटिव आले आहे. हा कॅम्प.रॅपिड ॲन्टिजेन शिबीर यशस्वीतेसाठी  नारायण डोह गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,व आशासेविका,मदतनीस,डॉ.दातिर मॅडम,डॉ.रायपेल्ली व त्यांचे सहकारी बांधव भगिनी  सिस्टर व कार्यकर्ते व ज्यांनी मनाचा मोठपणा दाखवून स्वतः येऊन कोराना चाचणी केली व सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
close