shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध..!!


हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
दि.३०,कोरोना प्रतिबंधक लस अत्यंत सुरक्षित असून  १ मे पासून सुरु होणाऱ्या सर्वसमावेश लसीकरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे . तसेच हिंगोली जिल्ह्याची  लसीकरणाची गरज लक्षात घेता ११ हजार २०० प्रतिबंधक लस खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने  उपलब्ध झाल्या आहेत . 
 
             
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक  लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे . जिल्ह्यामध्ये  लसींचा  तुटवडा असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे  खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबतचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी संपर्क साधून मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात केली होती त्यानुसार विभागीय उपायुक्ताना निर्देश देण्यात आले आणि तात्काळ  १० हजार कोविशील्ड आणि १२०० कोवॅक्सीन असे एकूण ११ हजार २०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या . 

कोरोना प्रतिबंधक लसी बाबत देशातील जनतेमध्ये भीती आणि शंका आहेत याबाबत जनजगृती करून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले. हिंगोली जिल्ह्यासाठी  आजवर ६० हजार लस उपलब्ध झाल्या असून  त्यापैकी ५४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. १ मे  पासून देशात १८ वर्षा वरील सर्वाना  लसीकरण करण्यात येणार आहे.  आगामी काळात  मोठ्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होणार आहे.   

लसीकरणाची  व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात ६२ ठिकाणी  लसीकरण केंद्र चालू करण्यात येणार असून,  गरजेनुसार केंद्र वाढविण्यात येतील असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण पुन्हा जोरात चालू होणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे  असेही  खासदार हेमंत पाटील म्हणाले.
close