shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना मृतदेह अंत्यविधीस नेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य विभागाला शिवसेनेचा दणका..!!

युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर मिळाली परवानगी...

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
दि३०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील एका ६० वर्षीय नागरीकाला श्वसणाचा त्रास होत असल्याने दि.३० एप्रिल शुक्रवार रोजी १०८ ऍम्ब्युलन्स ने त्यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.त्याची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन यांना मिळाली त्यांनी लगेच रुग्णालयात धाव घेतली.ऍम्ब्युलन्स मध्येच त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर त्यांची टेस्ट केल्यानंतर सदरील नागरिक कोरोना पॉजिटीव्ह आले.त्यानंतर त्याच्या सोबत आलेले कुटुंबातील सदस्य ही पॉजिटीव्ह आलेत.


ऍम्ब्युलन्स यंत्रणेने सदरील मृत बॉडी उतरून घेण्याचे सांगितले परंतु प्रवीण महाजन ह्यांनी आक्रमक पवित्रा घेत सदरील मृत आत्म्यास अंत्यविधी साठी नेण्याची व्यवस्था आरोग्य विभागाने करून द्यावी त्यानंतरच मृत व्यक्तीस खाली उतरू अस सांगितलं.. 

सदरील मृत रुग्णावर अंत्यविधी साठी मुख्याधिकारी शैलेश फडसे याना विनंती केली.त्यानंतर तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना घटनेची माहिती देत सदरील मृत व्यक्तीला अंत्यविधी च्या ठिकाणा पर्यत नेण्याची व्यवस्था करून देण्याची विनंती केली.अद्याप तरी मृतदेह ऍम्ब्युलन्स मधून बाहेर काढण्यात आला नसून मृत शरिर नेण्याची व्यवस्था करेपर्यंत ऍम्ब्युलन्स मधून मृतदेह काढू न देण्याचा पवित्रा घेण्यात आला.

त्यानंतर तहसीलदार जीवककुमार कांबळे,मुख्याधिकारी शैलेश फडसे ह्यांनी उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सदरील ऍम्ब्युलन्स मधून मृतदेह अंत्यसंस्कार साठी नेण्याचे आदेश तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिले.प्रवीण महाजन यांच्या आक्रमक पवित्र्याने मृत व्यक्तीची होणारी हेळसांड थांबली.घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाप्रमुख सदेशराव देशमुख, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, निखिल देशमुख,जगदीश पाटील,माणिक देशमुख युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती हे ही रुग्णालयात दाखल झाले.अंत्यसंस्कार साठी स्वतः तहसीलदार कांबळे,मुख्याधिकारी फडसे हे जातीने हजर होते.
close