shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मच्छीमार करणाऱ्यांना भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस हिम्मत राठोड यांच्याकडून धान्य वाटप..!!



हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर मच्छिमार करणाऱ्या भोई समाज बांधवांवर या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ घेऊन ठेवली असल्याची माहिती भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस हिम्मत राठोड यांनी स्वखर्चातून मोफत धान्य वाटप करण्यात आल्याने त्यांची होणारी उपासमार थांबली आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत  यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात कोरोना ची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे या संचार बंदी च्या काळात अनेक ज्यांच्या हातावर पोट आहे अशा मजूरदार कुटुंबांची उपासमार होत असून अनेकांना रोजगाराअभावी उपाशीपोटी राहण्यास भाग पडत आहे असेच तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील मच्छिमार करणारा भोई समाज हा संचारबंदीच्या काळात बंद असलेली मच्छिमार व त्यामुळे कुठलाही रोजगार अथवा जगण्यास साधन नसलेले कुटुंब अन्न शिवाय उपासमार होत असल्याची माहिती भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस हिम्मत राठोड यांना मिळताच त्यांनी आपल्या स्वखर्चातून या मच्छीमार कुटुंबास  प्रत्येक कुटुंब ५ किलो गहू ५ किलो तांदूळ असे एकूण १ क्विंटल ६० किलो धान्य वाटप करण्यात आले भाजपा युवा सरचिटणीस हिम्मत राठोड यांनी दाखविलेल्या दानवीर पणामुळे या मच्छीमार कुटुंबाची होणारी उपासमार काही काळासाठी थांबली आहे यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिम्मत राठोड बालाजी पाटील अमोल राठोड संतोष राठोड आदींच्या उपस्थिती होती.
close