नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
कोरोना रोखण्यासाठी शासन सर्व स्तरावर काम करत आहे.शासकीय आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया गावात आरोग्य तपासणी मोहिम राबविली जात आहे.
दहिगाव (ता.नगर) या ठिकाणी शुक्रवार (दि.३०) रोजी ग्रामपंचायत वतीने गावातील वाड्यात वस्ती वर जाऊन घरोघरी प्रत्येक कुटुंबातील नागरीकांची तपासणी माध्यमिक शाळेचे शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका कर्मचारी या पथकाने नागरीकांचे तपासणी मोहीम हाती घेतली यात नागरीकांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल, हृदय ठोके हे प्राथमिक तपासणी करण्यात येत होती.एका फोर्मवर कोविड तपासणी केली आहे का? या आधी कुटुंबातील सदस्य पाॅझिटिव्ह आला होता का? लसिकरण केले का? मोबाईल क्रमांक कुटुंबातील सदस्य संख्या,वय, अशा प्रकाची माहिती संकलन करण्याचे काम हे गावपातळीवर वरचे पथक काम करत होते.
या वेळी दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, ग्रामसेवक स्वाती घोडके, माध्यमिक शिक्षक मदन गांगर्डे, गोरक्षनाथ काळभोर, संजय गांगडेॅ, महादेव नाईक,सुरेश झांबरे,पत्रकार शिवा म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी पाराजी माने, आशा सेविका आशा जाधव,आशा चंदने,कमल जरे,आदी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या पाच सहा दिवसा पासुन रॅपीड ॲटिजन स्टेट किट उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना तपासणी कँप आयोजित करण्यात खुप अडचणी येत आहेत.या विषयी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.लवकरच कोरोना तपासणी कँप.व गाव तिथे लसिकरण राबविले जाणार आहे.
नगर पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भापकर.

