shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हत्तीरोग उपपथक मोर्शी तर्फे प्रा.आ.केंद्र अंबाडा येथे हत्तीरुग्णांना मॉरबिडीटी किट वाटप


मोर्शी - राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती अंतर्गत उपपथक मोर्शी कार्यक्षेत्रातील अंबाडा गावातील हत्तीरुग्णांना मॉरबिडीटी किट वाटप दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम पार पडलाा. 

या किट वाटपाचा शुभारंभ 10 मार्च 2021 रोजी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पार पडला होता. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर व जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांच्या मार्गदर्शनाखाली वितरण
करण्यात येत आहे. अंबाडा येथे आज दि.31/03/2021 रोजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सारंग भाऊ खोडस्कर सरपंच रुपालीताई रवींद्र कडू,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रुपेश ढोले,सतीश बेहरे,सुधीर उघडे,प्रशांत खोब्रागडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश जयस्वाल,वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत महाजन,डॉ.रुपाली पाटील,डॉ.रेणुका ठाकरे,सी.एच.ओ.शुभम वानखडे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.

यावेळी आरोग्य सहायक श्री.विनायक नेवारे,श्री.विनय शेलुरे,श्री.सुरेश राठोड आरोग्य कर्मचारी सुधाकर कडू,प्रकाश मंगळे,सदाशिव हुलगुंडे,राधाकिसन वैद्य,चंद्रसेन जाधव,राहुल भोसले व अंबाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
close