शहाजीराजे पुढे म्हणाले,जिजा! आम्हालाही तुम्ही एवढे दिवस माहेरी राहणे पसंत नव्हते पण! अम्ही एक राजकारणाचा डाव मांडला होता.नवी निजामशाही उभी करण्यासाठी एक मोहिम आखली,त्याप्रमाणे नाशिक, त्र्यंबकेश्वर,संगमनेर,जुन्नर,कोकणचा कांही भाग हस्तगत केला.जिवधन किल्ल्यावरील निजामशाही वंशातील एका मुलाच्या नांवाने द्वाही फिरवली व स्वतः कारभारी बनलो.
दौलताबाद फत्तेखानाकडे व जिवधन आमच्याकडे. एक खेळी खेळायची होती.दौलताबादचा पडाव!निजामशहाम व फत्तेखानाला जेर करुन तुमचे पिताजी लखुजी जाधवांच्या विश्वासघातकी झालेल्या हत्तेचा सूड घ्यावा, आणि झालेही तसचं!तुमच्या काका महाराजांनी पराक्रमाची शर्थ केल्याने दौलताबाद मोगलांकडे गेला. त्यांच्या पराक्रमाचा मोबदला म्हणुन मोगलांनी त्यांना वतनदारी दिली.म्हणजे स्वारींनी निजामशाहला त्याच्या दुवर्तना चा धडा शिकवला तर... पुढे ऐक जिजा! मुस्तफा कैद झाला.त्याचे साथीदार असद व मिर्झा नरुद्दीनला पकडुन थेट बेळगांवच्या किल्ल्यात रवानगी केली. त्यामुळे आदिलशहा खवासखानावर बिथरुन बजावण्यात आले की, मुरारराव शूर,पराक्रमी असुन त्यांनी आजपर्यंत पातशाहीशी इनाम राखलं म्हणुन आतां त्यांनी राजकारणातुन सन्यास घेऊन उरलेलं आयुष्य काशीक्षेत्री सुखानं घालवावं!
केवळ सत्तेच्या मोहात अडकुन स्वकीयांशी दुर्वतन करणार्या नि पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरवणार्या मुराररावाला अखेर पापाचं प्रायश्चित मिळाल तर....नंतर आम्ही मुराररावाला आमच्याकडे वळवल.दोघांच्या बळाने खवासखानास बाजुला सारायचा विचार होता.पण रणदुल्लाची खेळी यशस्वी झाली.आदिलशहाने दगलबाजीने सिद्दी रेहानकरवी खवासखानाची निर्घुण हत्या करुन त्याचे धडावेगळे मस्तक रणदुल्ला खानला भेट पाठवले.आणि मुरारराव एकटे पडले.तेही कैद झाले.त्यांची जीभ छाटुन गाढवावरुन धिंड काढली व शेवटी त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन कोल्ह्या-कुत्र्यांपुढे फेकण्यांत आले. शेवटी ज्याने हिंदु असुनही देव-देवळं भ्रष्ट केले स्वजनांवर अत्याचार केला त्या मुराररावांचा असा दुःखद अंत झाला आणि जिजा!आम्ही जुळवुन आणलेला डाव अशाप्रकारे उधळल्या गेला.हताश झालो आम्ही!याचा अर्थ स्वारी एकाकी पडली असच ना? पण जिजा! जेव्हा मोगलसरदार शाहिस्ताखान चिरंजीव शंभूराजेंवर चालुन गेला,तेव्हा मात्र आम्ही गप्प बसलो नाही.नाशिककडे चांभारगों द्यास चिरंजीवांना भेटुन मोगल फौजेला मागं हटवलं,आणि त्याचवेळी मोगल आणि आदिलशाहात तह होऊन मोगला तर्फे खानजमान आमच्यावल चालुन आला,त्याच्या सोबतीला रणदुल्लाही होता.पण आतुन रणदुल्ला आम्हाला सामिल असल्यामुळे त्याच्यामार्फत वाटा घाटी करुन निजामशहाला मोगलांच्या स्वाधीन केले आणि बारा हजार स्वारांनि शी विजापुरकरांची चाकरी पत्करली.
एक विचार जिजाऊंच्या मनात डोकावला जर शंभूराजे जर इथे असते तर शिवबा व शंभू दोघांमिळून आम्ही पाहिलेलं स्वप्न साकार होण्यास मदत झाली असती!पण स्वारींनी कधीच मना वर घेतलं नाही. शंभूराजे आमच्या जवळ कधीच येणार नाही याची पुर्ण जाणीव झाली.स्वारीनी ३-३॥ वर्षात कां येऊ शकले नाही याचं स्पष्टीकरण दिलं ते तितकसं पटलच नाही.त्यांनी सिंदखेडला येणं जाणुनबुजुन टाळल हे आम्ही ओळखले.त्यानंतर ऊध्वस्त जहागीरीत धाडण्याचा प्रसंग....
शिवबांवर संस्कार करतांना यवन द्वेष करीत होत्या म्हणजे त्याच कृत्याचा,विश्वासघातकीपणाचा,लबाडीचा,स्वार्थाचा.... त्याच्या धर्माचा नाही. शिवबाला सांगतांना त्या म्हणायच्या,जसं आपण देवळात जातो तसच दर्ग्यातही मस्तक टेकवतो ना? दारात आलेल्या फकीर यवनाला कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. शिवबा! कुणीही कुणाच्या धर्माला उपद्रव देऊ नये.दुसर्यांच्या देव देवतांच्या मूर्ती फोडु नये.आयाबहिणींची इज्जत करावी.जिजाऊ जहागीरीत असतांना हे सर्व आठवलं...आणि आठवला तो निरोपाचा प्रसंग!राजे म्हणाले होते,जिजा! मागची चुक आम्ही दुरुस्त केली.पहिल्यांदा जहागिरीत फक्त दादोजीपंताच्या जीवावर शिवबांसह तुम्हा ला धाडले होते, यावेळी सर्व तयारीनिशी सोबत अनेक विश्वासु माणसं देऊन पाठवत आहे.शिवाय शिवबाही आहेच. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे,आणि ती तुम्ही भरुन काढाल याची खात्री आहे.
माहिती संकलन
मुकेश पवार
पिंपरी-चिंचवड

