तालुक्यातील मांगूर तस्करांना तडीपार करून, पाठराखन करणा-या अधिका-यांची नार्को चाचणी करा-दुर्वास शेवाळे
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भिगवण ते तरडगांव पर्यंत शेकडो तलाव बांधून राजकारणातील मोठे बगळे हे अवैद्यपणे मांगूर माशाचे संवर्धन करुन त्याची रात्रंदिवस गाड्यांच्या गाड्या भरुन त्याची वाहतुक केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे मत्स्यविभागातील अधिकारी हे हप्ते घेत असल्याने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. तरी संबंधित मत्स्य अधिकारी यांची नार्को चाचणी करून या मांगूर माशाच्या तस्करी
करणा-यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून तडेपारीची,कारवाई करावी,अशी मागणी शिवसेना प्रणीत हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ते पुढे म्हणाले की, मूळ बांगलादेशी असणाऱ्या जीवघेण्या मांगूर माशाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. मांगूर मासा हा मत्स्य शौकिनांमध्ये लोकप्रिय असलेला मासा आहे. मात्र, हा मासा इतर माशांना खाऊन त्यांच्या प्रजातींचं अस्तित्व नष्ट करणारा आहे. तसेच या माशाच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोकाही वाढत आहे, त्यामुळे मांगूर माशाचे पर्यावरणावर आणि माणवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, राज्यसरकारने या माशाच्या संवर्धनावर तसेच विक्रीवर बंदी घालत मांगूर माशाच्या तळ्यांवर कारवाई करत शेकडो टन मासे जप्त करुन त्यांची मत्स्यशेती करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. असे असताना इंदापूर तालुका अपवाद का ?.या प्रकारावर प्रशासनातील अधिकारी, मूग गिळून गप्प का?मांगूर माशांचे संवर्धन करणारे, अधिका-यांचे जावई आहेत का असा सवाल दुर्वास शेवाळे यांनी उपस्थित केला.
या मांगूर माशांना खाद्य म्हणून जनावरांचे सडके मांस, कुजलेली अंडी, इतर खाद्य मास्यांना दिले जात आहे, याची वाहणातून वाहतुक करताना इतरांना याचा त्रास होत आहे, काही दिवसांनी माणसं सुध्दा हे मांगूर चे खाद्य बनेल आशी भिती शेवाळे यांनी व्यक्त केली, ते म्हणाले की तालुक्यात सुरू आसलेल्या , मांगूर मास्याच्या सवंर्धनावर व विक्री वर सोलापूर व पुणे मत्स विभागाला कारवाईचे आदेश द्यावे, तस्करी करणा-यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून, त्यांना तडीपार करावे, हे करण्यासाठी आम्ही, पुराव्यानिशी अधिकारी वर्गाना, सहकार्य करू, आसे शेवाळे म्हणाले,
या प्रजातीचे बांगलादेशा मार्फत बेकायदेशीर पणे
भारतात तस्करी होत आसल्याचे बोलले जातआहे ,
त्यात चिन मध्ये रोगराई पार्श्वभूमी वर सतर्कता बाळगली जात असताना, भारता मध्ये का नाही, आसा सवाल शेवाळे यांनी व्यक्त केला, ते म्हणाले की, थायलंड किंवा आफ्रिकन मांगूर मासा मांस भक्षक आसल्याने तो पर्यावरण व आरोग्याला घातक ठरत आहे, त्यांमुळे इंदापूर तालुक्यामध्ये, सुरू आसलेल्या मांगूर च्या विक्री वर कारवाई न झाल्यास तालुक्यातील सबंध मांगूर ची तळी आम्ही आमच्या पद्धती दिवसा ढवळ्या उध्वस्त करणार असल्याचा इशारा ही राज्य सरकार तसेच संबंधीत मत्स विभागाला, दिला आहे,
-----------------------------------------------------------

