shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी पुलावरील पडलेली संरक्षण भिंत ताबडतोब बांधा : काँग्रेस ने केली मागणी

निमगाव केतकी पुलावरील पडलेली संरक्षण भिंत ताबडतोब बांधा : काँग्रेस ने केली मागणी
      निमगाव येथील इंदापूर बारामती रास्ता हा मुख्य बाजारपेठेतून जातो. ह्या रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. ह्या रस्त्यावर जो गावातील पूल आहे त्या पुलावरील संरक्षण भिंत पूर्णपणे  कोसळलेली आहे व यातून मोठी दुर्घटना होऊ शकते. याची गंभीर नोंद शासनाने व लोकप्रतिनिधीने घ्यावी असे निवेदन आज इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी प्रांताधिकारी श्री कांबळे साहेब यांच्या कडे दिले. 
    तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी महत्वाची अशी पुलावरील संरक्षण भीतीकडे ठेकेदारांनी का दुर्लक्ष केलं असल्याचे ते म्हणाले.
       प्रांताधिकार्यानी देखील गांभीर्य लक्षात घेत लगेच संबंदित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या . 
     या वेळी तालुका महिला अध्यक्ष सीमा कल्याणकर, शहर अध्यक्ष चमन भाई बागवान, जिल्हा सरचिटणीस जकिर भाई काझी, सरचिटणीस निवास शेळके, सचिव प्रदीप शिंदे ,महादेव लोंढे , तालुका युवक सरचिटणीस मिलिंद साबळे , विध्यार्थी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष विपुल भिलारे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष राहुल जाधव ,आदी उपस्तिथ होते .
close