shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचेकडून महादेव जानकर यांचे सांत्वन

हर्षवर्धन पाटील यांचेकडून महादेव जानकर यांचे सांत्वन 
फोटो :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पळसावडे (ता.माण) येथे माजी मंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन सांत्वन केले.
इंदापूर प्रतिनिधी :
           भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांची गुरुवारी (दि.१) पळसावडे (ता.माण) येथे भेट घेऊन सांत्वन केले. महादेव जानकर यांच्या मातोश्री श्रीमती गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे बुधवारी निधन झाले.
        यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी श्रीमती गुणाबाई जानकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मातोश्रीच्या निधनामुळे जानकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती जानकर परिवाराला मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी केली. यावेळी महादेव जानकर व त्यांचे बंधू उपस्थित होते. 
________________________________

close