shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुक्यात एकुण १६१८ रुग्ण तर ६२ मृत्यू मार्च २०२१ मधे ३६७ रुग्ण तर ७ मृत्यू..!!

केज तालुक्यात ४९०० जणांनी लसीकरण करून घेतले  - डॉ विकास आठवले..!! 

 प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी  :- 

कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्या पासून आतापर्यत एकुण १६१८ रुग्ण बाधीत आढळले त्यापैकी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर मार्च २०२१ या महिन्यात सर्वात जास्त ३६७  रुग्ण कोरोना बाधीत निघाले तर ७ जणांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांनी दिली असुन प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क वापरावा तसेच हातधुणे आदी काळजी घ्यावी तसेच न घाबरता तपासणी करून घ्यावी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले असुन आतापर्यत केज तालुक्यात ४९०० जणांनी लसीकरण करून घेतले आहे 


कोरोना च्या आजाराने संपूर्ण जग व्यापले असताना आता ग्रामीण भागातही कोरोनानी आपले हातपाय पसरले आहेत केज सारख्या ग्रामीण भागात कोरोना सुरू झाल्यापासून या वर्षभरात ३१ मार्च २०२१ पर्यंत एकुण १६१८ कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले यापैकी ६२ जणांचा मृत्यू झाला असुन सध्या ६५ रुग्ण तालुक्यात आहेत बाकीचे रुग्ण ठीक होऊन घरी गेले आहेत . तालुक्यातील ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील किंवा ज्यांना काही त्रास जाणवत असेल त्यांनी तात्काळ अॕन्टिजेन टेस्ट करून घ्यावी व त्यांनी उपचार करून घ्यावा घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ विकास आठवले यांनी केले आहे . तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज , ग्रामीण रुग्णालय नांदुर घाट , प्राथमिक आरोग्य केंद्र आडस डॉ केकाण ८२०८२२१७५६ ,  बनसारोळा डॉ मोमीन ९२७००८२७०६ , चिंचोली माळी डॉ चौरे ९४०५६०९०५५ ,  राजेगाव डॉ तांबडे ९९२३९९१६५७ , विडा डॉ श्रीमती कांबळे  ९१५८४६१८४४ , यु वडगाव डॉ ब्राह्मणे ८८८८४८२१५६  या ठिकाणी तपासणी केली जाते यासाठी तरी सर्वांनी न भिता तपासणी करून घ्यावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क असने आवश्यक आहे तसेच गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये  सार्वजनिक ठिकाणी कुठेही हात लावू नये व चेहऱ्यावर सारखे हात लावू नये , हात नेहमी धुवावेत असे आवाहन डॉ विकास आठवले यांनी केले आहे 


४५वर्षाच्या पुढील  सर्वांनी लसीकरण करून घ्यावे डॉक्टर विकास आठवले केज तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय केज ग्रामीण रुग्णालय नांदुर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आडस बनसारोळा बनसारोळा चिंचोली माळी राजेगाव विडा यु वडगाव  तसेच उपकेंद्र होळ पैठण साळेगाव बाभळगाव मसाजोग तांबवा व खाजगी दवाखान्यात योगिता हॉस्पिटल व श्रेया हॉस्पिटल  या ठिकाणी लसीकरण चालू आहे रविवार वगळता दररोज सकाळी ९ ते ५ पर्यंत लसीकरण चालू असते आतापर्यत तालुक्यात ४९०० जणांनी लसीकरण केले असुन जिल्ह्यात केज तालुका हा लसीकरणासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे ४५ वर्षावरील नागरिकांनी covid web वर नोंदणी करावी किंवा या सेंटर वर जाऊन आधारकार्ड व मोबाईल सोबत नेऊन नोंदवून लसीकरण करावे असे आवाहनही डॉ विकास आठवले यांनी केले आहे
close