shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गणात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली....!


नगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची उदासिनतेमुळे कोविड सेंटर उभारण्यात दिरंगाई....!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
वाढत्या कोरोना संसर्ग मुळे शासनाने जनतेला‌ अनेक  निर्बंध लादली आहे. पण त्या प्रमाणात उपलब्ध सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. 

नगर-श्रीगोंदा चे आमदार श्री बबनराव पाचपुते यांनी नगर तहसीलदार प्रांत यांच्या चर्चा करून योग्य ते नियोजन करण्याचे आदेश दिल्यास  रुईछत्तीसी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.आणि या प्राथमिक आरोग्य केंद्र समोर जनता विद्यालय आहे.या जनता विद्यालयात कोविड सेंटर सुरू करता येऊ शकते .या ठिकाणी होणार खर्च आमदार निधीतून करावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. 

जनता विद्यालयाची या ठिकाणी मोठी शाळा  आहे. या ठिकाणी अडीचशेहून अधिक रुग्णाची व्यवस्था होईल या ठिकाणी पाणी सौचालय सुविधा उपलब्ध आहे.त्या मुळे रुईछत्तीसी गणात कोरोना कोविड सेंटर चालु झाल्यास या  दहा पंधरा गावातील रूग्णाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जो पर्यंत  नगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाची दखल घेत नाही. तो पर्यंत प्रशासनास पण  याकडे काना डोळा करत राहणार आहे. 

नगर मतदारसंघातील  प्रश्नावर लक्ष दिल्याशिवाय  कोविड सेंटरचा प्रश्न सुटणार नाही. अशी भूमिका रुईछत्तीसी चे माजी सरपंच रमेश भांबरे यांनी खंत व्यक्त केली. आम्ही या कोविड सेटर साठी जी शक्य आहे ती मदत करण्यास  तयार आहोत.तरी यांच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही. तर आम्ही रस्त्यावर उतरण्याचा विचार करू असे नगर शिर्डी एक्स्प्रेस शी बोलताना सांगितले.
close