आकडे वाढतात की वाढवले जात आहेत..;
काहीच कसे कळेनासे झाले... !
तोंडाला मास्क आहे का गळ्याला फास..;
काहीच कसे कळेनासे झाले...!
लस शोधली तशी..;
आमच्या भुकेवर एखादी लस शोधा...!
व्हायरसचा प्रादुर्भाव होवु नये..;
ह्यासाठी किती दिवस भुकेला कैदेत ठेवणार आमच्या...!
देशाला कोरोंन्टाईन करुन तुम्ही..;
आकड्यांची गोळाबेरीज करुन तुम्ही..!
देशाच्या कामगार शेतकरी सर्व.. सामान्य जनतेची भुक अन अभिव्यक्ती...;
जन्मास येणारा प्रत्येक जिव जंतु..
एक ना एक दिवस मरणारच..!
हा प्रकृतीचा नियम आहे .;
प्रत्येक जन प्रत्येक जिव मरणाला घाबरतो..;
प्रत्येक वस्तुवर टॅक्स जी. एस. टी. लावलाच आहे...!
आमच्या जगण्यावरही आमच्या हसण्या, रडण्यावरही महसुल लावताल तुम्ही...!
बंद खोलीत ए. सी. त बसुन आमचे आकडे फक्त मोजता..;
जस काय अमृत पिवुन पैदा झाल्या सारखं वागता..;
अन कॅमेर्या समोर बोंबलता...!
दुसरी लाट , तिसरी लाट अजुन कितीही लाटा आना..;
पण जनतेच्या भुकेशी अन आक्रोशाशी खेळु नका...!
कारण भुकेला कुठलाच जात धर्म वर्ण कळत नसतो..;
जनतेने एकदा का आक्रोश केला..;
मग तुमचा कुठलाच आकडा त्याला कळणार नाही..!
भुक मारुन जगतोय देश..;
जगाचा पोशिंदा शेतकरी काळ्या मातीत हीरवी भुक फुलवतो..; म्हणुन रे..
तुमच्या पोटाची आग विजते...!
पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढवले..; तसे त्याने दुधाचे शेतमालाचे भाव वाढवले नाही..!
अन तो वाढवणारही नाही..;
तोच आमचा पोशिंदा अन तुमचाही...;
तोच ह्या देशाचा खरा देशभक्त आहे..;
काळजी तर आम्ही आमच्या जिवाची घेतो, दुसर्यांच्या जिवाची पन घेतच आलोय..;
काळजी तुम्हीच घ्या तुमच्या सह कुटुंबाची...!
उद्याच्या बातम्या दाखवायला..; तुमचे कॅमेरेच जिवंत ठेवणार नाही..!
तेंव्हा तुम्हालाही कळेल भुक नावाची अवदासा..;
आक्रोश नावाचा भयानक अक्राळ विक्राळ राक्षस...!
आकाश सुपारे
9822510254

