नगर शहर । प्रतिनिधी (संजय वायकर):
अहमदनगर शहरातील वार्ड क्र. १३, नालेगाव या वार्डाचे शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक श्री. उमेशजी कवडे यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कशी मदत करता येईल, त्यांचा होणारा त्रास धावपळ , मानसिक ताण कसा कमी होईल यासाठी अहोरात्र झटत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री .उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आलेले 'शिवभोजन ' थाळी या ठिकाणी नगर शहरात कोरोना ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी लवकरच 'कोरोना मदत केंद्र' सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना या मदत केंद्रात बेडची सुविधा, ऑक्सिजन , व्हेंटीलेटर कोठे उपलब्ध असेल याची माहिती मिळण्यास मदत होईल.
यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होण्यास मदत मिळेल आणि गरजू रुग्णांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवता येईल. तसेच ते परिसरातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास आवाहन करत असताना त्यासाठी त्यांना मदतही करत आहेत .
रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शन चा होणारा काळा बाजार, चढ्या भावाने विकली जाणारी औषधे याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली .लोकांनी नियम पाळावेत, मास्क वापरावा यासाठी ते लोकांमध्ये जनजागृतीही करत आहेत . 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ' याप्रमाणे लोकांनी वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
विविध ठिकाणी कोरोना आजाराने मृत्युमुखी पडलेले रुग्ण याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली .मागील वर्षात लॉकडाऊन च्या काळात त्यांनी दररोज १०० लोकांना एकवेळचे जेवण मोफत पुरवून समाजा प्रती असणारी आपली जबाबदारी आणि प्रेम व्यक्त केले आहे .

