मनापासून करा काम
तयात वसे संपूर्णराम
कार्य क्षेत्र हेचि राज्य
रामरायाचे पवित्रधाम
राम राम बोलतो घाम
रोम रोम वसतो राम
फलप्राप्ती सहजहोय
कर्मयोग हो निष्काम
काम बदल हा विराम
मार्ग मात्र नसो वाम
समाधान मनापासून
महत्वाचा नाही दाम
स्वप्न पूर्ती देई स्फुर्ती
दमल्याओठी रामनाम
करूनही इतके काम
पहावाटे किती आराम
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com

