shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामनवमी आणि राम..!

श्रीराम ...!

सुखात आहे खराचं
हातात नाही  छदाम
गाळून चांगला  घाम
कमवत राहतो  दाम

जेवढे  अधिक  काम
बस  तेवढा  व्यायाम
कामा  मधला  बदल
वाटे  मनस्वी विश्राम

रावणवृत्ती  न अंतरी
माणसात पाही  राम
झोप येई  जमीनीवर
नाम  घेता राधेश्याम

आवडता सरळरस्ता
काम  ना  केले  वाम
वैरी कुणां ना  मानले
मित्रचं  बाकी  तमाम

झोपडीला नाही  दार
सर्वां वाटे त्यांचे धाम
घासातले खाताघास
आठवे शबरीचा राम

-- हेमंत मुसरीफ पुणे 
   9730306996
  www.kavyakusum.com
close