इंदापूर प्रतिनिधी:-
पडस्थळ ता. इंदापूर येथे दि. २४ एप्रिल रोजी एक दिवशीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. याचे उदघाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या कायदेशीर समितीचा सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ऑनलाइन उपस्थित राहत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे माजी सभापती पांडुरंग (तात्या ) मारकड, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रेडके, प्रगतशील बागातदार विष्णुदास रेडके यांनी केले.
कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लसीकरण सुरू आहे याचाच एक भाग म्हणून लसीकरण प्रत्येक गावात व्हावे यासाठी जनजागृती करीत एक दिवशीय लसीकरण मोहीम पडस्थळ याठिकाणी राबविण्यात आले या लसीकरण मोहिमेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीदेखील ऑनलाइन उपस्थिती दर्शविली लसीकरण मोहिमेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी पोलीस पाटील गणेश राऊत, इंदापूर तालुका भाजपा सोशल मीडिया उपाध्यक्ष प्रवीण बोंगाणे,जि. प. शाळा शिक्षक जाधव गुरुजी, घोळवे गुरुजी, समुदाय आरोग्य अधिकारी,डॉ. विद्या गायकवाड,आरोग्यसेविका श्रीमती रोहिणी म्हेत्रे,आशा सेविका श्रीमती वर्षा मुसळे व अश्विनी खरात,जयश्री नगरे ,लतिका व्यवहारे ,संगीता गोरे ,साधना कांबळे, स्नेहल ढावरे तसेच लस घेण्यासाठी आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

