चहा पाव आणि, बिस्कीटांचा नाष्टा
सोबतीस खारी, टोस्ट अती प्यारा
वडापाव आणि, पीझ्झा आवडीचा
कमजोर याने, झाला देह सारा !! १ !!
पहाटेच्या पारी, नाही उठायाचे
रात्री उशिराने, रोज जेवायाचे
मोबाईल हाती, पहाटेपर्यंत
जागरण रोज, ऐशी झाली रीत !! २ !!
सुर्यप्रकाशाचे, घडे ना दर्शन
नाही पाठपूजा, नाही संकीर्तन
उठता बसता, टिव्ही-मोबाईल
दिनचर्या सारी, गेली बिघडून !! ३ !!
अनेक वर्षांची, ऐशी झाली रीती
गेली कोमेजून, प्रतिकारशक्ती
तशातच आली, कोरोनाची फेरी
कैसे करू आता सांगा धन्वंतरी !! ४ !!
रचनाकार: चंद्रकांत शहासने,
देशभक्तकोशकार, पुणे
मोबाईल : ९८८१३७३५८५

