shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी

*

नगर प्रतिनिधी -(शिवा म्हस्के)

 कोरोना साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे सोडीयम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली.
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून साकतखुर्द येथे अत्तापर्यंत सुमारे वीस ते बावीस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गावात प्रथमच एव्हढया मोठया संख्येने रुग्ण आढळल्या मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील ज्या ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या भागात, तसेच ज्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली त्याठिकाणी , मंदिरे, सभामंडप, ठिकाणे, चौक, बसण्याचे बाकडे आदी ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली. सॊशल डिस्टन्सचे नियम पाळून ही फवारणी करण्यात आली. यासाठी उपसरपंच बाबासाहेब चितळकर, ग्रा.पं. सदस्य बापू निमसे, अविनाश पवार, पांडुरंग शिंदे, दादा पवार, सरपंच बापू केदारे, अविनाश निमसे, ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ केदारे आदींनी परिश्रम घेतले.
close