गेल्या वर्षापासून कोरोना संदर्भात जे काही चाललेलं आहे त्यातून एक गोष्ट लक्षात येत आहे की, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे.
आता रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे याबाबत विस्ताराने जनआंदोलन आणि संशोधन या दोन्हींची गरज आहे.
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आपल्या सभोवती कचरा तयार होणार नाही आणि दररोजच्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाईल याची काळजी प्रथमत: घेणे गरजेचे आहे. जी गोष्ट आम्ही सातत्याने दुर्लक्षित करत टाळत आहोत.
दुसरा मुद्दा स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दिनचर्या नियमित असावी, म्हणजे वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे यासोबत आरोग्यास हानी पोचणार नाही अशा प्रकारचा आहार घेणे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निश्चित वाढते. सकाळचा प्राणायाम अथवा व्यायाम हा यासाठी उपयुक्त असतो. सूर्यकिरणांमध्ये दररोज बसणे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते. परंतु सध्यास्थितीत आपल्या घरांची रचना अशी आहे की मोकळे आकाश दिसतच नाही.
आम्ही प्रचंड वृक्षतोड केलेली आहे आणि ऑक्सिजन पुरविणारी झाडे लावण्याची पद्धती बंद केलेली आहे. परिणामी झाडांपासून विपूल ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची कमतरता झालेली आहे. यासोबत आमचा मांसाहार एवढा पराकोटीचा वाढलेला आहे की गल्लोगल्ली मांसाहाराची विक्री केंद्रे अगदी उघड्यावर दिसतात. यामुळे जी दुर्गंधी आणि मांसाचा उरलेला कचरा पसरतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे.
दररोजच्या दिनचर्येतून केमिकलयुक्त साबण, शाम्पू, भांडी घासण्याची पावडर, यातून निघणारे दूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे पाणी शुद्ध करणारी जीवसृष्टी विनाशाकडे चाललेली आहे. कारखान्यांचे दूषित पाणी नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. या सर्वांमुळे दूषित अन्न, दूषित पाणी आणि दूषित हवा याची पराकोटीची त्रास देणारी अवस्था आजमितिला आपण अनुभवत आहोत. ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याकडे झालेला आहे. यासोबत वाढलेली प्रचंड वाहने. त्यामुळे व्यायामाचा अभाव आणि उघड्या मैदानातील कमी झालेले खेळणे हे आरोग्यास घातक ठरत आहेत.
आम्ही उशिरा उठतो, उशीरा झोपतो, मन मानेल तेव्हा खातो आणि निकृष्ट आहार घेतो. याचे परिणाम आपण कोरोना सारख्या वेळोवेळी येणाऱ्या साथींचे बळी ठरत आहोत.
आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या घरातच असलेले आले, हळद ,ओवा, जीरे, मोहरी, दालचिनी,लवंग, कढीपत्ता असे अनेक पदार्थ हे ऍंटीकॅंसर म्हणून मान्यताप्राप्त आहेत. आपण यांचा औषधी म्हणून वापर असतो हेच विसरलोय. हे जागरण ज्याचे त्याने आत्मपरिक्षणाने करायला हवे.
भारतीय वंशाच्या देशी गाईचे गोमूत्र हे देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे.ते कफ, पीत्त,वाताचे संतुलन करते. मात्र हे प्रत्येकाला खात्रीशीर मिळेल याची शाश्वती नाही. तथापी ज्यांचेकडे देशी गोवंश आहे त्यांना गोमूत्र सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला काय हरकत आहे.
सर्व उपाय घरचेघरी शक्य आहेत तथापी यासाठी आरोग्य साक्षरता नि आत्मपरीक्षण गरजेचे आहे.
चंद्रकांत शहासने, पुणे
निसर्गोपचारक. ९८८१३७३५८५

