shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर मिनी लॉकडाउन व त्यामागील गोरगरिबांची परिस्थिती...!!


संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
संगमनेर मध्ये सोमवार दिनांक ५/०४/२०२१ पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अशी माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. पण आता या मिनी लॉकडाउन मागे गोरगरिबांच्या जीवनावर मोठा फरक पडला आहे. जे रोजंदारी करून आपले एक दिवसाचे पोट भरायचे, त्यांनी आता काय करायचे असा सवाल शासनापुढे आता उभा राहिला आहे. या लॉकडाउन नंतर व्यवसायिक वर्गाकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली.

कापड दुकाने व सलून किमान थोड्या वेळापुरते ही चालू ठेवण्याची परवानगी हवी होती. मिनी लॉकडाऊन जर असाच राहिला तर सामान्य जनतेचे जीवन कठीण होईल व सामान्य जनतेने खायचे काय ..?असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर मध्ये मिनी लॉकडाउन वर शासनाने पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती व्यापारी वर्गाकडून व सामान्य जनतेकडून करण्यात आली आहे.
close