shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तमाशा फड, मालक आणी तमाशा कलावंताना अर्थिक मदत द्या - सुधीर वैरागर


प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई : महाराष्ट्रातील तमाशा फड मालक आणी तमाशा कलावंत यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी फुले-शाहू-आबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


     या संदर्भात आधिक माहीती देताना सुधीर वैरागर यांनी सांगितले की कोरोनामुळे महाराष्ट्राची लोककला तमाशा आर्थिक अडचणीत आलेला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, अर्थमंत्री, सामाजिक न्यायमंत्री  यांच्याकडे निवेदन पाठविले असून त्यामध्ये राज्यातील सर्व तमाशा फड मालक व तमाशा कलावंत यांची माहिती संकलित करून त्याचे बँक खात्यावर तात्काळ आर्थिक मदत पाठविण्यात यावी. अशी मागणी बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी केलेली आहे. 
 सवाल ..
रसिकाचे मनोरंजन करणारे रघुवीर खेडकर आणी मंगलाताई बनसोडे याचे अश्रू शासनकर्ते आणी राज्यकर्ते कधी पुसणार हा सवाल आहे 
               सुधीर नाथा वैरागर 
                बहुजन नेते
close