नगर :- प्रतिनिधी-(शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील दहिगाव येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालेला असून मंगळवार (दि.६) झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये ३७ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एकूण १०० लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दहिगाव येथील १२ साकत २ वाटेफळ १ व वाळुंज १२ वाळकी १ शिराढोण १ तांदळी ७ हातवळण १ असे एकूण ३७ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. निगेटिव्ह ६३ असे रिपोर्टर आले.
या अगोदर साकत या ठिकाणी तपासणी मध्ये दहिगाव येथील ४ साकत येथेल ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यानंतर आणखी टेस्ट घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. यासंदर्भात माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या पाठपुराव्याने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे यांनी दखल घेतल्याने आज मंगळवार दहिगाव या ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात आली.
यामध्ये केलेल्या चाचणीत गावातील आणखी १२ जणांची भर पडली असल्याने गावाकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान येथील काही बाधित रुग्णांनी खाजगीत टेस्ट केल्या आहेत व ते यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यानी आजार लपवून ठेवला. गावातील फॅमीली डाॅक्टर कडे औषध उपचार केले व दुखणं अंगावर काढले. या आजारी माणसांना अनेकजण भेटल्याने गावातील बऱ्याच जणांना याचा प्रसाद मिळाला. त्यामुळे बाधितांची संख्या वाढतच चाललेली आहे. त्यामुळे नगर तहसीलदार व तालुका अधिकारी यांनी दहिगाव साकत वाळुंज या ठिकाणी भेट देऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लावणं अत्यंत गरजेचे आहे. कोरोना रुग्ण वाढतं चालेले आहे. गावपातळीवर योग्य ते निर्णय घेणं अपेक्षित आहे अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. कॅप यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच वैद्यकीय अधिकारी एस. ए. ससाणे यांच्या मार्गदर्शना खाली, वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत यादव, परिचारिका मनीषा बनसोड, संदप भालसिंग , बांगर आशा सेविका जाधव, अंगणवाडी सेविका कमल जरे, आशा चंदने, उपसरपंच महेश म्हस्के, सरपंच मधुकर म्हस्के, नाना गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष अनशाबापु म्हस्के,महादेव म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी परिश्रम घेतले.

