shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावेडी येथील कचरा डेपोलाच मिळाले कोविड स्मशानभूमीचे स्थान...! ना पाणी ना.. , ना काही..?


प्रचंड प्रमाणात पाण्याची गैरसोय, हातपाय धुण्यासाठी तर सोडाच पिण्यासाठी देखील मिळेना पाणी;

कोविड प्रेताची कमालीची अवहेलना ; दुसऱ्या दिवशी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून येताहेत कोविड प्रेतं..!

अहमदनगर महानगर पालिका प्रशासनाचा कारभार ढिसाळ..?

अहमदनगर । रमेश जेठे विशेष प्रतिनिधी : 

कोरोनाने संपुर्ण जगभरात , देशासह, महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे, महाराष्ट्रात सध्या मृत्युचे तांडव चालू आहे. यावेळी गरीबांना सेवा देणारी जिल्ह्यातील एकमेव शासकीय यंत्रणा म्हणजेच "सिव्हिल हॉस्पिटल" होय.
सावेडी येथील कचरा डेपोत होताहेत मयत कोव्हीड रूग्ण दहन..!


अहमदनगर शहरातील शासकीय 'सिव्हिल हाॅस्पिटल' येथे कोरोनामुळे अंदाजे दररोज २५ ते ८० च्या दरम्यान रुग्ण मृत्युमुखी पडतात, त्यामुळे प्रशासनावर कदाचित ताण पडत असेलही..?


मात्र वास्तविकक्ता अशी आहे की,
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाने आदल्या दिवशी मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बोलाविण्यात येते, तथा मृत रुग्णांचे प्रेत मात्र दुपारी १२.३० च्या नंतर बाहेर काढून शहरातील अमरधाम स्मशानमभूमी फुल असल्यामुळे आता ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचे निधन झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून अहमदनगर महानगर पालिकेच्या सावेडी येथील कचरा डेपोलाच दि.२६/०४/२०२१ पासून पर्यायी स्मशानभूमीचे स्वरुप दिल्याने याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी कोरोना मृतदेह आणले जाते.

या ठिकाणी महानगर पालिकेच्या किंवा भाडोत्री ॲंम्बुलन्समध्ये एकाच वाहनात पाच, पाच प्रेतं आणले जातात, अणि सावेडी कचरा डेपोतील तात्पुरत्या स्वरूपाच्या पर्यायी स्मशानभूमीत आणले जाते. हे ठिक आहे. परंतू या स्मशानभुमी येथे कामासाठी मजूर उपलब्ध नाहीत, म्हणून दोन ते तीन तास ते वाहन एकाच ठिकाणी प्रेतांसह उभे करतात,आणि नातेवाईकांना अक्षरशः दोन-तीन तास तिष्ठत ठेवतात. हे येथील वास्तव आहे.

यावेळी मृतांचे नातेवाइक दु:खी अंतःकरणाने सकाळी १० वाजेपासून उपाशीपोटी आलेले असतात, त्यांना येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तेथे हातपाय धुण्यासाठी पाणी कसे मिळणार ?, नातेवाईकांना सकाळपासून तीन, चार वाजेपर्यंत येथे ताटकळत थांबावे लागते, त्यामुळे मृतांचे कुटुंबीयांना अक्षरशः चक्कर येऊन खाली कोसळतात ही विदारक परिस्थिती येथे सर्रास दिसून येते. 

येथील कर्मचारी मन मानेल तसे वागतात, त्यांचेवर कुणाचे तरी नियंत्रण असेलही परंतु तेथील परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. 

या ठिकाणी कोरोना प्रेतं ही दरऱोज २० ते ५० दहन केले जाताहेत. सावेडी येथील कचरा डेपो हे ठिकाण अहमदनगर शहरापासून ६ ते ७ किमी लांब असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे याठिकाणी येण्यासाठी कमालीचे हाल होतांना प्रत्यक्ष दिसत आहे.

प्रेतं अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळतात..!



या ठिकाणी मृतदेह गणिक जास्त लोक येत नसले तरी घरातील कुटुंबीय व काही नातेवाईक अंतिम संस्कार व
दर्शनासाठी येथे येतात. 

यावेळी या दु:खांकित लोकांना योग्य सूचना न देता. त्यांना कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात. प्रेताग्नी दिल्यानंतर येथून लोक निघून जातात. व हिंदु धर्मशास्त्र प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी राख सावडायच्या विधीसाठी आल्यानंतर अनेक प्रेतं अर्धवट किंवा जळालेलेच नसल्याचे दिसते. हे येथील विदारक सत्य आहे. त्यामुळे प्रेतदेहाला कुत्रे, इतर प्राणी खाऊ शकतात, हे नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न देखील नागरीकांकडून विचारला जात आहे.

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने खुप तहान लागते. त्यामुळे अन्न पाणी नसल्यामुळे या कोरोनाकाळात ऑक्सिजन पातळी कमी होण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही. 

त्यामुळे या घटनेमुळे नवीन प्रसंग निर्माण होऊ शकतात. आणि मृतांचे कुटुंबीय दु:खात असल्याने ते सकाळी जेवण करून कोणी येत नाहीत, तसेच त्यांना संध्याकाळचे चार-पाच वाजतील याची पुसटशी कल्पनाही नसते. त्यामुळे नातेवाईकांचे या ठिकाणी खुप हाल होत आहेत, ही विदारक वस्तुस्थिती आहे. 


पाण्याच्या टाक्या दोन‌‌ परंतु पाणीच नाही..!

स्मशान भुमी परिसरात दोन पाण्याच्या टाक्या ही बसवलेले आहेत, हे चांगले जरूर आहे. परंतू त्यात पाण्याचा थांगपत्ताच नाही. म्हणजेच महानगरपालिकेने पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय केलेली या ठिकाणी आढळून येत नाही.


तरी यापुढील काळात नागरिकांच्या अडचणी व सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त, तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित  खात्याच्या प्रशासकीय अधिकारी यांनी आपली जबाबदारी म्हणून नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन भविष्यात यावर तातडीने उपाय योजना करून नागरिकांना दिलासा द्यावा हीच सर्व सामान्य नागरिकांची माफक अपेक्षा आहे.
close