shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेटी बचाओ, बेटी पढाओ..मुकेश प्रतिष्ठान चे मुख्य उद्दिष्ट..! अभिनेते प्रविण तरवडे यांचेही योगदान..!!

पुणे । प्रतिनिधी:
 कु. अलिना सलीम बेग वय वर्ष
06 आहे, रा. गोलंदाज चौक, वडारवाडी...हिच्या वडिलांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामूळे मुख्य आधार निघुन गेला. आता आई ब्युटी पार्लर मध्ये ४००० रु पगारावर काम करते. तिच्या आई ला सद्धया मुलीची फी भरण्या इतपत सुद्धा पैसे नाहीत. ही मुलगी ज्ञानार्थ प्री प्रायमरी शाळेत (पांडव नगर) शिकत आहे.

सामाजिक काम करणाऱ्या मुकेश प्रतीष्ठान ने या मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले असून तिची वार्षिक फी तसेच शैक्षणिक दृष्टीने आवश्यक असणार्या सर्व गोष्टीची पुर्तता कु.अलिना साठी करणार आहेत.

सदर मदत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक,निर्माते,अभिनेते श्री प्रविणजी तरडे (देऊळबंद,मुळशी पॅटर्न फेम) यांच्या हस्ते देण्यात आली.

 सदर प्रसंगी सौरभ देशपांडे, सचिन दगडे,मारुती जाधव,भागवत पवार,सोनिया ताई मुंडे,ज्ञानार्थ शाळेच्या संचालिका सौ.शीतल भिसे,शेखर सर आणि मुकेश पवार उपस्थित होते.
यापुर्वी मुकेश प्रतिष्ठान ने २५ मुलिंचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. जास्तीत जास्त गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचे मुकेश प्रतिष्ठानचे पुढील उद्दीष्ट आहे.

यासाठी जे कोणी मदत करण्यास इच्छुक असतील त्या व्यक्तींनी श्री महेंद्र सुमन रामदास पवार अध्यक्ष मुकेश प्रतिष्ठान यांना कळवावे.प्रतिष्ठान ती मदत योग्य हातांपर्यंत पोहिचविण्यास ही संस्था कटिबद्ध राहिल..

या  कु. अलिना बेग च्या शिक्षणासाठी विशेष मोलाची मदत करणारे श्री.अजय गांडेकर सर, श्री अनिस अहमद सर आणि श्री परवेज शेख यांचे व श्री जमील शेख यांचे देखील विशेष आभार.
close