इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलचे १४ वे सत्र येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार असून कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर ) आपल्या अभियानाला ११ एप्रिलपासून सनरायझर्स हैद्राबाद विरूद्धच्या चेन्नई येथील सामन्याने करणार आहे. युएई मध्ये खेळल्या गेलेल्या तेराव्या आयपीएल सत्रात सलामीच्या जोडी पासून मधली व फिनिशर पर्यंत केकेआर फलंदाजीत गटांगळ्या खात होते. स्पर्धेच्या मध्यान्हालाच कर्णधार बदलाव्या लागलेल्या केकेआरला या सत्रात मागच्या वेळेस झालेल्या सर्व चुका दुरूस्त करून नव्याने सुरुवात करावी लागेल. तरच त्यांचे भविष्य उजळेल.
तेराव्या आयपीएल सत्रात सलामीवीर शुभमन गिल अतिशय धिमा खेळला. त्याने त्यावेळी अनेक चेंडू वाया घालविले. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव वाढला. या वेळी त्याला सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करावा लागेल. मागच्या सत्रात विंडीजचे दोन प्रसिद्ध खेळाडू आंद्रे रसेल व सुनिल नारायण यांची कामगिरी निराशजनक होती. शिवाय कर्णधार मॉर्गनला केकेआरच्या संघाची योग्य मोट न हाकता आल्याने गौतम गंभीरचे केकेआर सोडून गेल्यानंतर सलग दोन वर्ष प्ले ऑफ मध्ये जागा मिळविण्यात आलेले केकेेआरचे अपयश लक्षवेधक बनले आहे.
इंग्लंडला एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक जिंकून देणारा कर्णधार ओएन मॉर्गनने मागच्या सत्राच्या मध्यान्हालाच कर्णधारपदाचे सुत्रे दिनेश कार्तिककडून घेतले होते. शिवाय तुफानी फटकेबाजी करत त्याने केकेआरकडून सर्वाधिक २४ षटकार ठोकतना ४१८ धावाही फटकविल्या होत्या. परंतु त्याची एकाकी झुंज त्यावेळी केकेआरला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवून देण्यात कमी पडली होती. मात्र सन २०२० च्या सत्रात आलेले अपयश त्याला या १४ व्या सत्रात धुवून टाकायचे आहे.
मागच्या सत्रात अपयश आले असले तरी केकेआरने त्या सत्रात खेळलेले १७ खेळाडू कायम ठेवले आहेत. तर बांंगलदेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीी अल हसन व ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटींग्जला संघात नव्याने स्थान दिले आहे. त्यामुळे आंद्रे रसेल व सुनिल नारायणला पर्याय उपलब्ध झाले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा आयसीसी मानांकनातला क्रमांंक एकचा पॅट कमिंंस न्यूझिलंडचा लॉकी फर्ग्युसन व भारताचा उभारता सितारा प्रसिद्धध कृष्णाचा भक्कम आधार आहे.
डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदिप यादव कमालीचा अपयशी ठरला असून मागच्या सत्रात त्याला पाच सामन्यात एकच बळी मिळाला आहे. सन २०१२ व १४ मध्ये गौतम गंभिरच्या नेतृत्वात मिळविलेल्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावलेला फिरकी गोलंदाज सुनिल नारायण अपयशी ठरला शिवाय संदिग्ध गोलंदाजी शैलीबद्दल त्याला चेतावनी मिळाल्याने संघाच्या गोटात खळबळ उडाली होती. त्यामुळे तो चार सामन्यांना मुकला होता. सुनिल नारायणच्या गैरहजेरीत रहस्यमय फिरकीपटू वरूण चक्रवर्तीीने १७ बळी घेत संंघाला आधार दिला होता. परंतु त्याचाही तंदुरूस्तीचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे केकेआरने अनुभवी फिरकी गोलंंदाज शाकिब अल हसन व हरभजनसिंगला आपल्या चमूत घेवून स्पीन विभाग बळकट केला आहे.
केकेआरचा पूर्ण संघ असा आहे -
इयोन मॉर्गन (कप्तान), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नीतिश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिंस, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब-अल-हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोड़ा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर व पवन नेगी.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

