shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना रुग्नाच्या मदतीसाठी रमेशराव आडसकर सरसावले..!!



 कस्तूरबा गांधी विद्यालय धारूर येथे सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवणार..!! 

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 
येथे कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात मंजूर झालेल्या शंभर बेड च्या कोव्हिड केअर सेंटरला अत्यावश्यक सर्व सुविधा जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी पुरवण्याचे जाहीर केले असून प्रशासनास संकट काळात स्वतःची  जबाबदारी म्हणूण ते हे काम करत असून येथे गंभीर रुग्नासाठी पाच आॕक्सीजन बेड ची  सुविधा करण्यात येणार आहे .त्यांच्या या पुढाकाराचे सर्वञ कौतूक होत आहे.


धारूर येथे कोरोन प्रादूर्भाव वाढत असतान या पुर्वी 160 बेड चे कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे. येथील रुग्न संख्या पुर्ण झाल्याने कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात 100 खाटाचे कोव्हिड सेंटर मंजूर झाले आसून 14 कर्मचारी मंजूर केले आहेत .आशा संकट काळात आपली सामाजीक जबाबदारी म्हणूण भाजपाचे युवक नेते अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी पुढाकार घेऊन या कोव्हिड सेंटर मधील रुग्नाची निवास व्यवस्था, भोजन , नाष्ट व इतर अंत्यावश्यक सुविधा स्वतः येथे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.


येथे येणारे रुग्नाची गरज लक्षात घेऊन गंभीर रुग्नांना बाहेर हाॕस्पीटलला बेड मिळत नसाल्याने या केअर सेंटर मध्ये पाच आॕक्सीजन  सीविधा असणारे बेड असणारा स्वतंञ कक्ष उभारण्यात  येणार असून या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्या साठी रमेशराव आडसकर हे दोन दिवसा पासून स्वतः या केअर सेंटर वर व्यवस्था उपलब्ध करून देण्या साठी लक्ष ठेवून आहेत सर्व सोयी सुविधा व सुसज्ज असे कोव्हिड सेंटर या रुपाने धारूर परीसरातील नागरीकाना उपलब्ध होणार आहे.
close