शेतकऱ्यांला झालेल्या नुकसानभरपाईची अपेक्षा.
खर्डा । प्रतिनिधी :-
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
खर्डा शहर जवळ असलेल्या खर्डा- भूम रस्त्यावर शौकत शब्बीर शेख यांच्या डाळिंबाच्या बागेला अचानक आग लागल्याचे शेजारी असल्यालेल्या पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाच्या रात्री अडीचच्या दरम्यान फोन आला तेव्हा पाण्याचा टँकर आणून विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु आग आटोक्यात आला नाही.
या डाळिंब बागेबरोबर अडीच एकर शेतीमधील ठिबक चे पाईप जळून मोठे नुकसान झाले . तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी घटनास्थळी पाहणी करून जळीत फळबागेच्या केलेल्या पंचनाम्यात चार लाख ५८हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले .फळबागेसह ठिबकच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी शौकत शेख यांनी केली.

